एकनाथ शिंदेंची मोठी खेळी! २ माजी महापौरांचा ‘धनुष्यबाण’ हाती; विरोधकांना मोठा धक्का

On: January 6, 2026 4:23 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Nashik Politics | राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज्यभर दौरे करून शिवसेनेची ताकद वाढवण्यावर भर देत आहेत. अशातच नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून दोन माजी महापौरांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Nashik Municipal Election 2026)

महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारे पक्षांतर हे नवीन नसले तरी प्रचार सुरू असतानाही घडलेल्या या घडामोडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या (eknath shinde) नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा ‘ऑपरेशन’ यशस्वी करत विरोधकांना धक्का दिल्याचे चित्र दिसत आहे.

दोन माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश :

नाशिक महानगरपालिकेचे (Nashik mahapalika) माजी महापौर अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभ दीप’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिकमधील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Nashik Politics | उमेदवारीचा फटका आणि राजकीय गणित :

अशोक मुर्तडक हे मनसेच्या सत्ताकाळात महापौर होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्याच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. (Former Mayor Joins Shiv Sena)

दुसरीकडे, दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी महापौर होते आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा मुलगा प्रेम पाटील आधीपासूनच शिवसेनेत असून प्रभाग क्रमांक ९ मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे दशरथ पाटील शिवसेनेत परतणार, अशी चर्चा होती आणि आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन्ही माजी महापौरांच्या प्रवेशामुळे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Nashik Politics: Eknath Shinde’s Big Operation, Two Former Mayors Join Shiv Sena

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now