नाशिकला पुराचा धोका वाढला; ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

On: July 23, 2026 7:56 PM
Nashik Flood
---Advertisement---

Nashik Flood | रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक (Nashik) शहरासह उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत वाढणाऱ्या पावसामुळे गोदावरी (Godavari) नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून ऐतिहासिक रामकुंड परिसर जलमय झाला आहे. प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ :

अखंड पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती (Dutondya Maruti) मंदिराच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचल्याने परिस्थितीची तीव्रता स्पष्ट झाली आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नदीकाठच्या भागांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.

गंगापूर धरण (Gangapur Dam) येथून गोदावरी पात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. सध्या 12,600 ते 13,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून दुपारी होळकर पूल (Holkar Bridge) परिसरातील प्रवाह 17,390 क्युसेकपर्यंत पोहोचला होता. या ठिकाणी इशारा पातळी 13,000 क्युसेक तर धोका पातळी 19,000 क्युसेक निश्चित करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत विसर्ग 19,000 क्युसेकच्या पुढे गेल्यास सराफ बाजार (Saraf Bazaar) तसेच नदीकाठच्या सखल वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Nashik Flood | पूल पाण्याखाली, ग्रामीण भागातही सतर्कतेचा इशारा :

सततच्या पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. रामकुंड परिसरातील रामसेतू पूल (Ramsetu Bridge) पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गाडगे महाराज पूल (Gadge Maharaj Bridge) यालाही पुराच्या पाण्याचा स्पर्श झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने पोलिस आणि महापालिकेने गोदाघाट परिसरातील दुकाने, टपऱ्या आणि स्टॉल्स तातडीने हटविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नदीकाठच्या 3 ते 4 फूट उंचीपर्यंत असलेल्या घरांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी गंगापूर, गौतमी गोदावरी धरण (Gautami Godavari Dam) आणि कश्यपी धरण (Kashyapi Dam) परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याची माहिती दिली. पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

News Title: Nashik Flood Alert Intensifies

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now