अजित पवारांचे विश्वासू नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार?;’त्या’ फोटोमागील सत्य समोर

On: May 11, 2024 1:54 PM
Narhari Zirwal Explain About Viral Photo of MVA Campaign
---Advertisement---

Narhari Zirwal | अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी काल (10 मे) महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचार सभेत हजेरी लावली होती. यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. झिरवळ मविआमध्ये सामील होण्याच्या चर्चा देखील रंगल्या.

नरहरी झिरवळ यांचे सभेतील फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले होते. या फोटोमुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या. यामुळे नाशिकच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर स्वतः नरहरी झिरवळ यांनी त्या व्हायरल फोटोमागील सत्य सांगत या चर्चेवर स्पष्टीरकण दिलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून भारती पवार तर मविआकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दिंडोरीमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ आमदार आहेत. काल झिरवळ यांचे भास्कर भगरे यांच्या सभेतील फोटो व्हायरल झाले होते.

नरहरी झिरवळ यांचं स्पष्टीकरण

“माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ज्या गावामध्ये प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रह खातर मी खुर्चीवर बसलो”, असं नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी म्हटलं की, काही मिनिटातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी तिथून निघून गेले होते. मी अजित पवारांसोबतच आहे, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलं आहे.

“मी अजित पवारांसोबत..”

दरम्यान, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ यांच्यासाठी निवडणुकीत श्रीराम शेटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीराम शेटे हे शरद पवारांचे जवळचे मानले जातात. याच ठिकाणी मविआकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात श्रीराम शेटे यांची सुद्धा भूमिका होती, असं बोललं जातं. नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचे श्रीराम शेटे यांच्याशी चांगले संबंध असून महायुतीमध्ये असल्यानेच त्यांना भगरे यांच्या समर्थनाथ बोलता येत नसल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

News Title –  Narhari Zirwal Explain About Viral Photo of MVA Campaign

महत्त्वाच्या बातम्या-

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Join WhatsApp Group

Join Now