‘एकनाथला सांग, मला…’; नरेश म्हस्केंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

On: March 28, 2025 12:11 PM
Naresh Mhaske Explosive Political Claims
---Advertisement---

Naresh Mhaske | राजकारणात वादळी विधानं नवीन नाहीत, मात्र ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलेल्या दाव्यांमुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेनेतील फूट, संजय राऊत (Sanjay Raut) यांची भूमिका, तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊतांवरील दावा

शिवसेना फुटीनंतर अनेक आरोप आणि चर्चा सुरू असताना, नरेश म्हस्के यांनी एक मोठा खुलासा करत संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर, संजय राऊत यांनी अनेकदा फोन करून “एकनाथला (Eknath Shinde) सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल वाईट विचार करू नकोस,” असं सांगितल्याचा दावा म्हस्केंनी केला.

या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. म्हस्के म्हणाले की, राऊत यांनी याप्रकारे संवाद साधला होता, पण आता ते ती गोष्ट विसरले आहेत. “ही बंद मूठ उघडली तर परिस्थिती तुमच्यावरच उलटेल,” असा थेट इशाराही त्यांनी राऊतांना दिला. याशिवाय, शिंदे यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला बोलावले होते, मात्र आम्ही त्यांच्याकडे न जाता शिंदेंच्या बाजूने उभे राहिलो, असेही म्हस्के यांनी ठामपणे सांगितले.

उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

नरेश म्हस्के यांनी फक्त राऊतच नाही, तर उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावांनाही दूर लोटले, असे सांगत त्यांनी औरंगजेबाशी तुलना केली. “औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला, उद्धव ठाकरेंनी काय वेगळं केलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

म्हस्केंनी आरोप केला की, बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाला त्यांनी बाजूला ठेवले, पण प्रॉपर्टीसाठी कोर्टात दावा केला. इतकंच नाही तर, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या विरोधकांशी हातमिळवणी करून पक्षाला दुखावले, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या घणाघाती टीकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील काळात अजून खुलासे होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Title : Naresh Mhaske Explosive Political Claims

 

Join WhatsApp Group

Join Now