शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

On: July 22, 2026 11:56 AM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर चर्चा :

संसद परिसरात झालेल्या या भेटीची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर दिली. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचे चार छायाचित्रे शेअर करत ही बैठक झाल्याचे सांगितले.

या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पेपरफुटीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा :

या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यासंदर्भातील निवेदनही पंतप्रधानांकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पेपरफुटीच्या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका काय आहे, याबाबतही नरेंद्र मोदी यांनी आपले मत शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील चर्चेची अधिकृत माहिती देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

News Title: Narendra Modi Meets Sharad Pawar in Delhi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now