Narendra Modi Giorgia Meloni | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या इटली (Italy) दौऱ्यावर आहे. रोम (Rome) मध्ये पाऊल ठेवताच त्यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यासोबत त्यांचा काढलेला एक नवा फोटो इंटरनेटवर तुफान वेगाने पसरत आहे. दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचे प्रतीक मानला जाणारा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या दौऱ्याला राजनैतिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रोममध्ये मोदींचं भव्य स्वागत
संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates), नेदरलँड्स (Netherlands), स्वीडन (Sweden) आणि नॉर्वे (Norway) दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) इटली (Italy) येथे पोहोचले. राजधानी रोम (Rome) येथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र सेल्फी घेतला.
हा सेल्फी मेलोनी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर करत “रोममध्ये स्वागत आहे, माझ्या मित्रा!” असे कॅप्शन दिले. त्यामुळे हा फोटो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पंतप्रधान मोदींचा हा इटलीतील पहिलाच अधिकृत दौरा असून, मेलोनी यांच्या निमंत्रणावरून ते येथे पोहोचले आहेत.
मोदी-मेलोनी मैत्री आणि दौऱ्याचं महत्त्व
मोदी आणि मेलोनी यांच्यातील मैत्री यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे. दुबई (Dubai) येथे २०२३ मध्ये झालेल्या COP28 परिषदेदरम्यान दोघांचा एक सेल्फी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये अपुलिया (Apulia) येथे झालेल्या G7 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी “टीम मेलोनीकडून नमस्कार” असा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यानेही लक्ष वेधून घेतले होते.
Upon landing in Rome, had the opportunity to meet Prime Minister Meloni over dinner followed by a visit to the iconic Colosseum. We exchanged perspectives on a wide range of subjects. Looking forward to our talks today, where we will continue the conversation on how to boost the… pic.twitter.com/df0bDYKCdU
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
या एकदिवसीय दौऱ्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच मोदी आज दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (Food and Agriculture Organization – FAO) मुख्यालयालाही भेट देतील. २०२३ नंतर दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट असून, ती भारत (India)-इटली (Italy) संबंध अधिक दृढ होत असल्याचे प्रतीक मानली जात आहे.
News Title: Narendra Modi Giorgia Meloni Selfie Goes Viral Again amid Italy Visit






