Narendra Modi | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काही दिवसांवर आले आहे. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मोठं वक्तव्य केलं आहे. ईडीने जप्त केलेले पैसे हे पुन्हा गोरगरिबांना देणार असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) एका वर्तमानपत्राला मुलाखती दरम्यान वक्तव्य केलं आहे. मोदी गोरगरिबांना खरंच पैसे परत करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
ईडीकडील पैसे गोरगरिबांना परत करणार – नरेंद्र मोदी
दरम्यान, मोदी सरकार येण्याआधी भाजपने गोरगरिबांच्या बँक खात्यावर तब्बल 15 लाख रूपये दिले जातील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही गोरगोरिबांच्या बँक खात्यात एक रूपया देखील आला नाही. अशातच आता मोदींनी ईडीकडील असलेले पैसे पुन्हा गोरगरिबांना परत करणार असल्याचं आश्वासन केलं आहे.
भ्रष्टाचारी लोकं आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून गोरगरिबांचे पैसे उकळतात. मला गोरगरिबांपर्यंत पैसे पोहोचयचे आहेत. मात्र मला ते पैसे गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला कायद्यात बदल करावा लागणार असून मी सध्या कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे, असं मोदी म्हणाले आहेत. (Narendra Modi)
“देशात ईडीने तब्बल 1.25 लाख कोटी रूपये जप्त केले”
देशात ईडीने तब्बल 1.25 लाख कोटी रूपये जप्त केले आहेत. ईडीने पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. यामध्ये मी दोन प्रकारच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत आहे. त्यातील एक म्हणजे उद्योगातील भ्रष्टाचार याचा फटका हा निष्पाप लोकांना भेटतो. पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भारतीत झालेला घोटाळा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. (Narendra Modi)
केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या सहाकारी बँकांमधून पर्सनल बिजनेस पार्टनरशिपच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला आहे.
लालूप्रसाद यादव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या मोबदल्यात अनेक जमिनी स्वत:च्या नावावर करुन घेतल्या. त्यातून मी आता ईडीने पैशांचा माग काढत ते पैसे देणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
News Title – Narendra Modi Big Statement About Return Money Seized By Ed To The Poor
महत्त्वाच्या बातम्या
“मोदी फक्त गायीवर बोलतात महागाईवर बोलत नाहीत”, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका
महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट!
…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा, थेट म्हणाले..
दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे, ‘या’ उमेदवाराने शिंदे गटावर केला आरोप






