मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेमध्ये नाराजी; बड्या नेत्यानी दिला राजीनामा

On: December 15, 2024 4:12 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Shivsena l आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्यात बड्या आमदारांना फोन गेले आहेत. त्यामुळे आता ज्यांना फोन गेले आहे, त्यांचे मंत्रिपद तर निश्चित झाले आहे. परंतु या विस्तारावरुन नाराजीनाट्य देखील समोर आलं आहे. कारण शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी आज उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना उपनेतेपदाचा दिला राजीनामा :

याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कारण जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझं बोलणं झालं होत. मात्र त्यानंतरही त्यांनी शब्द पाळला गेला नाही असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

तसेच शिवसेनेचे नेते आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आता शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा देखील दिला आहे.

Shivsena l नरेंद्र भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज? :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात त्यांना कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजनामा दिला आहे. मात्र यामुळे आता नरेंद्र भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

News Title :  Narendra Bhondekar resignation due to displeasure

महत्वाच्या बातम्या –

“थोड्याच वेळात मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन हे नक्की”, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

परभणी हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ तरुणाचा कोठडीतच मृत्यू, वातावरण तापणार?

अखेर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांची नाव फिक्स! पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now