Narayan Rane l गेल्या काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटले आहेत. कारण या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आज राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.
हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा : निलेश राणे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. अगदी त्याचवेळी खासदार नारायण राणे हे त्या राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. यामुळे पोलिसांनी खासदार नारायण राणेंना मुख्य गेट बाहेर थांबवून ठेवले. या प्रकरणावरून नारायण राणे आणि निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे आले असताना भाजप नेते नारायण राणे व निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी दोन्ही राणेंना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये तुफान बाचाबाची झाली.
Narayan Rane l रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन; नारायण राणे संतापले :
यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांना देखील सक्त ताकीद दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतर देखील हे असं कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन आमच्या अंगावर येत आहेत. त्यामुळे त्यांना गपचूप निघायला सांगा. तसेच पोलिसांनी देखील आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही असं भाजप नेते निलेश राणे त्यावेळी म्हणाले.
राजकोट किल्य्यावर झालेल्या संपूर्ण राड्यावर भाजप जेष्ठ नेते नारायण राणें यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असणार आहे. त्यांना परत येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी देखील द्या, मग मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. मग कोणालाही सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे.
News Title – Narayan Rane vs aaditya Thackeray in Rajkot fort
महत्त्वाच्या बातम्या-
युवा पिढीला रोजगार मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात औद्योगिक शहर वसणार
PPF आणि सुकन्या समृद्धी अकाउंट असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार
नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट






