“मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!”, नारायण राणेंनी नितेश राणेंचे कान टोचले

On: June 11, 2025 1:48 PM
Narayan Rane
---Advertisement---

Narayan Rane | “भाजपचा मुख्यमंत्री महायुतीतील सगळ्यांचा बाप आहे,” या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले राज्याचे मंत्री नितेश राणे यांना आता स्वतःचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीच समज दिली आहे. “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. तो जनतेचा सेवक असतो,” असे स्पष्ट करत नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

ते धाराशिव येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी नारायण राणेंनी नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

निधी अडवणे चुकीचे, महाजनांवरही तुटून पडले :

नारायण राणेंनी नितेश राणेंच्या (Nitesh Rane) निधीवाटपावर केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. “कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. याबाबत मी स्वतः सूचना देणार आहे,” असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. “प्रकाश महाजन हा मानसिक असंतुलित माणूस आहे. माझी त्याच्याशी तुलना का करता? मी दिल्लीला होतो, तो इकडे क्रांती चौकात उभा असतो. त्याला भेटायला मी येणार?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “माहिती नाही, पण ते एकत्र आले तर ते चांगलेच होईल.”

Narayan Rane | ठाकरे गटाचा जोरदार प्रत्युत्तर; ठाण्यात लावला बॅनर :

नितेश राणेंच्या “बाप” वक्तव्यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका बॅनरद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिलं. “मी तुषार दिलीप रसाळ… श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत,” असा मजकूर असलेला बॅनर ठाण्यातील तीन हात नाका परिसरात झळकला होता. मात्र नंतर महानगरपालिकेने तो बॅनर हटवला.

नितेश राणेंच्या विधानावर भावाचाही रोष :

धाराशिवच्या कार्यक्रमात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी “कोणी कितीही नाचलं तरी भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे,” असं विधान केलं होतं. यावर शिंदे गटाचे आमदार आणि नितेश राणेंचे भाऊ निलेश राणे (Nilesh rane) यांनीही नाराजी व्यक्त केली होती. “वक्तव्यामुळे कोणाचा फायदा होतो हे समजून बोला,” असं म्हणत त्यांनी एक ट्विट केलं होतं, जे नंतर हटवण्यात आलं.

News Title: Narayan Rane Slams Son Nitesh Rane: “CM Is Not Anyone’s Father, He Is Public Servant”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now