धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणीचा’ मृत्यू

On: October 14, 2024 2:00 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला राज्यभरातून देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच काल नांदेडमध्ये महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला हजारोच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील महिला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र या मेळाव्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे.

महिला सशक्तीकरण मेळाव्यात महिलेचा मृत्यू :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये महिला सशक्तीकरण मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. मात्र यावेळी कांताबाई मोरे या महिलेला अवस्थ वाटू लागले आणि अचानकपणे चक्कर आली. यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला.

कांताबाई मोरे असं या महिलेचं नाव आहे. मात्र त्यानंतर त्या महिलेला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात देखील पाठवण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे कांताबाई यांचं निधन झालं असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवला जात आहे.

Maharashtra l या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय :

तसेच ती महिला शरहरालगत असलेल्या भनगी येथील रहिवासी आहे. मात्र आता या धक्कादायक घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रशासनाच्यावतीने तब्बल 249 बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News Title – Nanded Woman Dies at Chief Minister Program

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईत टोलमाफी! राज ठाकरे म्हणाले,”आमच्या आंदोलनाला यश..”

महागड्या गाड्या, आलिशान घर, बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर

आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, पण नेमकी कुठे?

राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now