55 वर्षीय उपसंरपंचाकडून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून धक्कादायक खुलासे समोर

On: April 16, 2025 7:28 PM
Crime
---Advertisement---

Nanded crime | राज्यात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका विकृत घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावातील उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे सर्व परिसर हदरला आहे. 

उपसरपंचाचं विकृत कृत्य-

गावातीलच 55 वर्षीय उपसरपंचाने (Nanded crime) केवळ 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे गुंगीचे औषध देत दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकारातून मुलगी गर्भवती राहिली असून, तिने काही आठवड्यांपूर्वी एका चिमुरड्या मुलीला जन्म दिला आहे.

विशेष म्हणजे, आरोपीने हे प्रकरण दडपण्यासाठी नवजात बाळाची विक्री केल्याचा गंभीर संशय पोलिसांना आहे. ही संतापजनक घटना तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बाबुराव तुपेकर याला अटक केली आहे.

पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास-

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी उपसरपंचाने मागील (Nanded crime) वर्षभरापासून पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत तिच्यावर अत्याचार केला. सुरुवातीला गुंगीचे औषध देत तिचे शोषण सुरू करण्यात आले आणि नंतर धमकी देत हे कृत्य अनेक वेळा घडवले गेले.

पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर गावात ही बाब उघड होऊ नये म्हणून आरोपीकडून अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आलेअखेर, पीडितेची प्रसूती नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर बाळाला कुठे ठेवले गेले याचा ठोस तपशील मिळत नसल्याने बाळाची विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान,आरोपी उपसरपंच बाबुराव तुपेकर याला नांदेड पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि महिला संघटनांकडून होत आहे. 

Title : Nanded crime 16-year girl raped by sub-committee member

Join WhatsApp Group

Join Now