76 व्या वर्षी नाना पाटेकरांचा कमाल फिटनेस, VIDEO पाहून व्हाल थक्क

On: April 30, 2026 3:55 PM
Nana Patekar Fitness
---Advertisement---

Nana Patekar Fitness | आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सहजसुंदर अभिनयासाठी ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar Fitness) यांनी सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. नेहमी साधी राहणीमान जपणारे नाना आता त्यांच्या एका नव्या अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही ते ज्या प्रकारे व्यायाम करत आहेत, ते पाहून भलेभले फिटनेस फ्रीक आणि त्यांचे चाहते आश्चर्याने थक्क झाले आहेत.

व्यायाम करतानाचा थक्क करणारा व्हिडीओ

प्रसिद्ध छायाचित्रकार आणि निर्माता अतुल कस्बेकर (Atul Kasbekar) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) खात्यावर एका व्हिडीओच्या माध्यमातून नानांचा हा थक्क करणारा अवतार जगासमोर आणला. या व्हिडीओमध्ये हे दिग्गज कलाकार साध्या कपड्यांमध्ये आणि गळ्यात एक साधा गमछा टाकून चक्क ट्रायसेप डिप्स मारताना कैद झाले आहेत. हे करताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण किंवा थकवा जाणवत नाहीये. अतिशय लीलया आणि आरामात ते हा कठीण वाटणारा व्यायाम प्रकार करत असून, हे दृश्य अनेकांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.

View this post on Instagram

A post shared by Atul Kasbekar (@atulkasbekar)

सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर भरभरून प्रेम आणि प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने या व्हिडीओवर टाळ्या वाजवणारे इमोजी देऊन त्यांचे कौतुक केले. एका चाहत्याने त्यांना सर्वांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने गमतीशीर टिप्पणी करत, नानांनी या फिटनेसमध्ये चक्क रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांनाही मागे टाकले असल्याचे म्हटले आहे. यासोबतच मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिनेदेखील ‘बापरे.. कमाल’ अशा शब्दांत आश्चर्य व्यक्त करत टाळ्यांच्या इमोजीद्वारे त्यांना दाद दिली.

News Title: Nana Patekar Fitness Video At Age 76 Viral

Join WhatsApp Group

Join Now