धक्कादायक बातमी! बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा हॉटेलमध्ये मृत्यू; क्रिकेट विश्वात एकच खळबळ

On: March 31, 2026 2:29 PM
Samruddhi Highway Accident
---Advertisement---

William Legnford Death | मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयपीएल सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी Board of Control for Cricket in India (BCCI) शी संबंधित ब्रॉडकास्ट इंजिनियर विल्यम लेग्नफोर्ड (William Legnford) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील प्रसिद्ध ट्रेडेन्ट हॉटेल येथे आढळून आला. (IPL 2026 News)

पोलिसांनी तपास सुरू केला :

माहितीनुसार, 30 मार्च रोजी सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूममध्ये प्रतिसाद मिळत नसल्याने तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. विल्यम लेग्नफोर्ड हे 24 मार्चपासून हॉटेलमधील 2715 क्रमांकाच्या खोलीत राहत होते. सकाळी रिसेप्शनमधून फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मास्टर कीने खोली उघडली असता ते आत मृत अवस्थेत आढळून आले. तातडीने बोलावलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (BCCI Engineer Death)

या घटनेची नोंद मुंबई पोलीस यांच्या मराईन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणीनंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

William Legnford Death | कोण होते विल्यम लेग्नफोर्ड? :

विल्यम लेग्नफोर्ड हे मूळचे ब्रिटनचे नागरिक होते आणि ते आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी भारतात आले होते. IPL 2026 च्या सामन्यांच्या ब्रॉडकास्ट व्यवस्थापनाशी ते संबंधित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

News Title: Mystery Death in Mumbai: BCCI Broadcast Engineer William Legnford Found Dead in Hotel After IPL Match

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now