Murlidhar Mohol | पुणे शहरातील कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी (19 फेब्रुवारी) एका तरुण अभियंत्यावर कुख्यात गुंडाच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी बाहेर काढण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. (Murlidhar Mohol)
शिवजयंती मिरवणुकीतून दुचाकी काढण्यावरून वाद
बुधवारी झालेल्या या घटनेत देवेंद्र जोग या तरुण अभियंत्याला गज्या मारणे या कुख्यात गुंडाच्या गटाने मारहाण केली. शिवजयंती मिरवणुकीतून आपली दुचाकी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना वाद झाला आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. देवेंद्र जोग हा भारतीय जनता पार्टीचा (BJP) कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी गज्या मारणेचा भाचा अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुरलीधर मोहोळ यांची देवेंद्र जोग यांना भेट
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मारहाण झालेल्या देवेंद्र जोग यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. त्यानंतर पुण्यात परतल्यानंतर त्यांनी जोग यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “गुजरात आणि दिल्ली दौऱ्यावर असल्याने मी पुण्यात पोहोचल्यानंतर थेट देवेंद्रच्या घरी गेलो. संपूर्ण घटना समजून घेतली आणि त्याच्या कुटुंबाला धीर दिला.
देवेंद्र हा एक गुणी संगणक अभियंता आहे आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही वाट्याला न जाणाऱ्या अशा तरुणाला मारहाण होणे दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत.” (Murlidhar Mohol)
Title : Murlidhar Mohol warning to the Pune police






