पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ!

On: June 9, 2024 9:49 PM
Murlidhar Mohol
---Advertisement---

Murlidhar Mohol | पुण्याचे खासदार मुलरीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी (PM Modi Oath Taking Ceremony) लागली आहे.

मुलरीधर मोहोळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीतील (Delhi) राष्ट्रपती भवन परिसरात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी जमली होती.

मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळालं. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत.

मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे.

पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने तरुणाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणाल्या…

रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातील ‘हे’ नेते घेणार शपथ!

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरात उभी फूट, सख्खे भाऊ आले आमने-सामने

विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी तिसऱ्यांदा बनले कॅबिनेट मंत्री!

राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरींचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now