Mumbai | मुंबईतील (Mumbai) एका महिलेने ‘ब्लिंक इट’च्या (Blinkit) डिलिव्हरी बॉयने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ पोस्ट (Video Post) करत डिलिव्हरी बॉयने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर ‘ब्लिंक इट’ने दिलगिरी व्यक्त करत कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नेमके काय घडलं?
या महिलेने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ब्लिंक इट’चा डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) पार्सल (Parcel) घेऊन आला. पार्सल दिल्यानंतर आणि पैसे घेताना त्याने तिच्या छातीला स्पर्श केला. डिलिव्हरी बॉय ‘ब्लिंक इट’च्या गणवेशात होता आणि हे गैरवर्तन करूनही त्याने काही केले नाही अशा प्रकारे बेमालूमपणे वागला, असे महिलेने म्हटले आहे. ‘ब्लिंक इट’वरून ऑर्डर दिल्यानंतर हा ‘घाणेरडा आणि किळसवाणा’ अनुभव आल्याचे तिने म्हटले असून, ‘ब्लिंक इट’ने यावर बोलले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
‘ब्लिंक इट’ची कारवाई आणि माफी-
महिलेने व्हिडिओ(Mumbai) पोस्ट केल्यानंतर ‘ब्लिंक इट’ने या घटनेची तात्काळ दखल घेतली. सुरुवातीला ‘ब्लिंक इट’ने (Blinkit) महिलेची तोंडी तक्रार फेटाळली होती, पण व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन देत महिलेची माफी मागितली. इतकेच नाही तर, संबंधित ‘ब्लिंक इट’ ड्रायव्हरचे (Driver) कंत्राटही (Contract) रद्द (Canceled) केल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘ब्लिंक इट’ने (Blinkit) घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत महिलेला योग्य ती कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यासही सांगितले आहे.
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit …is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO
— S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युझर्स (Users) महिलेची बाजू योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काही जणांनी ‘कदाचित चुकून झाले असेल’ अशी शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. काही युझर्सनी (Users) महिलेने संमतीशिवाय व्हिडिओ कसा रेकॉर्ड (Video Record) केला, असा प्रश्न विचारला आहे, तर अनेकांनी ‘ब्लिंक इट’ (Blinkit) डिलिव्हरी बॉयची चूक असल्याचे म्हटले आहे.
News Title – Mumbai Woman Accuses Blinkit Delivery Boy of Misconduct






