मोठी बातमी! मुंबईतील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

On: February 18, 2025 11:18 AM
Pune News
---Advertisement---

Mumbai Sex Racket | मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात सहार पोलिसांनी (Sahar Police) मोठी कारवाई करत एका गेस्ट हाऊसमध्ये (Guest House) सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Mumbai Sex Racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली, तसेच दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी पीडित मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून देहव्यापार करवून घेत होते आणि तिला विदेशी ग्राहकांकडे पाठवत होते. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीचा वापर

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या (Andheri) मरोळ नाका परिसरातील (Marol Naka Area) एका गेस्ट हाऊसमध्ये (Guest House) देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती सहार पोलिसांना (Sahar Police) मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गेस्ट हाऊसवर छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली, तसेच गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली. सलमान आणि जबरूल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी सलमान आणि जबरुल हे आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणींना हेरून त्यांना वेश्याव्यवसायात ओढत होते. त्यांना विदेशी पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता, दोन्ही आरोपी पीडितांना विदेशी पुरुषांकडे पाठवायचे आणि ग्राहकांनी दिलेल्या रकमेपैकी फारच कमी रक्कम या महिलांना दिली जायची. उर्वरित सर्व पैसे आरोपी स्वतःकडे ठेवायचे.

आणखी आरोपींचा शोध सुरू

सहार पोलिसांनी (Sahar Police) सेक्स रॅकेटमध्ये (Sex Racket) अडकलेल्या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला बालसुधारगृहात (Juvenile Home) पाठवले आहे. हे रॅकेट केवळ दोन व्यक्ती चालवत नसून यात आणखी काही लोक सामील असण्याची शक्यता पोलिसांना आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच, ज्या विदेशी नागरिकांकडे या मुलींना पाठवले जात होते, त्यांची ओळख पटवण्याचे कामही सहार पोलीस करत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Mumbai Sex Racket)

Title : Mumbai Sex Racket Minor Girl Rescued Two Arrested

 

Join WhatsApp Group

Join Now