मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! धरणातील पाणीसाठ्यात घट, ‘या’ तारखेनंतर पाणी कपातीची शक्यता

On: April 22, 2025 8:51 AM
Mumbai Water Crisis
---Advertisement---

Mumbai News | मुंबईत आगामी काही आठवड्यांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा मर्यादित असून, जूनमध्ये पाऊस वेळेवर न पडल्यास पाणीबाणी निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Mumbai News)

मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट

मुंबईच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. 21 एप्रिल रोजी उपलब्ध असलेला एकूण पाणीसाठा 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर इतका असून, यामध्ये अप्पर वैतरणा – 68312, मोडक सागर – 29268, तानसा – 33131, मध्य वैतरणा – 66494, भातसा – 199854, विहार – 11105 आणि तुळशी – 3190 दशलक्ष लिटरचा समावेश आहे.

मुंबईला दररोज सुमारे 3950 दशलक्ष लिटर पाणी लागते. संपूर्ण वर्षासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा सुमारे 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असतो. पण सध्या केवळ 28.42 टक्के पाणी शिल्लक आहे. याशिवाय राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिलेला राखीव 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळूनही, जुलै अखेरीपर्यंतच पुरेसा ठरू शकतो.

तूर्तास पाणी कपात नाही

सद्यस्थितीत पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नाही, मात्र 15 मे रोजी सातही धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील धोरण जाहीर केले जाईल. पालिकेच्या (Municipal Corporation) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर मान्सून न आल्यास टंचाई वाढू शकते.

त्यामुळे पाणीबाणी टाळण्यासाठी आतापासून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांतील तुलनात्मक पाणीसाठा

सद्यस्थिती पाहता, मागील तीन वर्षांत धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे राहिला आहे:

  • 2023: 4,24,453 दशलक्ष लिटर
  • 2024: 3,27,289 दशलक्ष लिटर
  • 2025: 4,11,355 दशलक्ष लिटर

यावर्षीचा साठा मागील वर्षांपेक्षा जास्त असला तरीही हवामानातील अनिश्चिततेमुळे धोका कायम आहे.

Title : Mumbai News mumbai faces Water Crisis If No Rains in June

 

 

Join WhatsApp Group

Join Now