मुंबईत चालू बसममध्ये सुरु होता सेक्स, लोकांना सगळं दिसलं!; व्हायरल व्हिडीओनं खळबळ

On: April 24, 2025 12:50 PM
MUMBAI NEWS
---Advertisement---

Mumbai News | नवी मुंबई (Navi Mumbai) येथे रविवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. पनवेल ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) बसमध्ये एका तरुण जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत बसमध्येच शारीरिक संबंध ठेवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

व्हिडिओ व्हायरल –

रविवार, 20 एप्रिल रोजी ही घटना घडली असून, प्रवासादरम्यान बसमध्ये (Mumbai News) जवळ कुणीही नव्हतं. याचाच गैरफायदा घेत एका तरुण जोडप्याने मागच्या सीटवर असभ्य वर्तन केलं. ही घटना एका दुचाकीस्वाराने पाहिली आणि त्याने लगेच 22 सेकंदांचा एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला, त्यानंतर तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.

या प्रकरणावर नवी मुंबई (Mumbai News) महापालिकेच्या परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बस कंडक्टरने वेळेत लक्ष न दिल्याने आणि योग्य ती कारवाई न केल्यामुळे त्याच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या तरी पालिकेने पोलीसांकडे तक्रार दिलेली नाही.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य बेकायदेशीर-

या तरुण जोडप्याचे वय २० च्या आसपास असल्याचे सांगितले जात असून, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेले कृत्य भारतीय कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) कलम २९६ नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यास तीन महिने तुरुंगवास किंवा ₹१,००० पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

ही घटना केवळ नैतिकतेच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही गंभीर मानली जात असून, यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

News Title – mumbai news Couple Caught Having Sex in NMMC Bus

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now