मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोच्या भूमिगत मार्गात गती, ‘हा’ प्रवास होणार अधिक सोपा

On: April 8, 2025 10:54 AM
Mumbai Metro Line 3
---Advertisement---

Mumbai Metro Line 3 |  मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेचा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. भुयारी प्रवासासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना आता लवकरच थेट आरे ते वरळी दरम्यान मेट्रोने प्रवास करता येणार आहे. (Mumbai Metro Line 3)

आरे-वरळी थेट भुयारी मेट्रो प्रवासास तयार 

मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) लाईन 3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याच्या सुरक्षेच्या अंतिम चाचण्या सध्या सुरू आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (CMRS) पथक सध्या या मार्गाची तपासणी करत आहे. या तपासणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्यानंतर काही दिवसांतच हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

हे टप्पे सुरू झाल्याने आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून थेट वरळी, दादरपर्यंत प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतून दादर व दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः वरळी, आचार्य अत्रे चौक व बीकेसीसारख्या गर्दीच्या भागांत मेट्रोमुळे वाहतूक आणि वेळ दोन्हींची बचत होईल.

33.5 किमी भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होण्याच्या मार्गावर

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ही एकूण 33.5 किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका असून यात 27 स्थानके आहेत. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो असल्यामुळे तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या प्रकल्पाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) करत असून, पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.

आता दुसरा टप्पा प्रवाशांसाठी खुला होत असल्याने या मार्गावर प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः वांद्रे ते चर्चगेट दरम्यान गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने या भुयारी मेट्रोला महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे.

Title : Mumbai Metro Line 3 Aarey to Worli Underground Metro Soon

 

Join WhatsApp Group

Join Now