Mumbai Local Train | मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी (9 फेब्रुवारी 2025) रेल्वेकडून अभियांत्रिकी (Engineering) आणि देखभालीची (Maintenance) कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) अप (Up) आणि डाऊन (Down) जलद मार्गावर (Fast Line), तर हार्बर मार्गावर (Harbour Line) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus – CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रे (Chunabhatti/Bandra) दरम्यान ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mumbai Local Train)
मध्य रेल्वेवरील ब्लॉकचे वेळापत्रक:
माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर: सकाळी 10:58 ते दुपारी 3:10 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या: माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर (Slow Line) वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या (Thane) पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा: सकाळी 11:25 ते दुपारी 3:27 या काळात मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे: सकाळी 11:16 ते दुपारी 4:47 वाजेपर्यंत
सकाळी 11:16 ते दुपारी 4:47 या काळात: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी (Vashi) / बेलापूर (Belapur) / पनवेलकडे (Panvel) जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द असतील.
सकाळी 10:48 ते दुपारी 4:43 वाजेपर्यंत: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे (Goregaon) जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळी 9:53 ते दुपारी 3:20 या काळात: पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 या काळात: गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai Local Train)
विशेष लोकल आणि प्रवासाची परवानगी:
ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल (Panvel-Kurla-Panvel) या दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 या काळात मेन लाईन (Main Line) आणि वेस्टर्न लाईन (Western Line) स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Title : Mumbai Local Train Megablock on Sunday February 9th Check Details






