IPL संपताच मुंबई इंडियन्समध्ये होणार उलथापालथ; संघ व्यवस्थापन मोठे निर्णय घेणार

On: April 18, 2026 5:38 PM
Mumbai Indians
---Advertisement---

Mumbai Indians | आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सुरुवातीच्या सामन्यानंतर संघाचा फॉर्म घसरला आणि पराभवांची मालिका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर हंगाम संपल्यानंतर संघ व्यवस्थापन काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्नचिन्ह :

या मोसमात मुंबईने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता, पण त्यानंतर संघाने 5 पैकी 4 सामने गमावले. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर टीका होऊ लागली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची कामगिरीही निराशाजनक ठरली असून त्याने 5 सामन्यांत फक्त 106 धावा केल्या आहेत. 2018 पासून संघात असलेल्या सूर्यकुमारबाबत पुढील हंगामात काय निर्णय घेतला जाईल, याबाबत संभ्रम आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबतही मोठी चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार झाल्यानंतर रोहित संघ सोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 30 एप्रिलला 39 वर्षांचा होणाऱ्या रोहितने मागील हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळले होते. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या या कर्णधाराबाबत मुंबई मोठा निर्णय घेऊ शकते.

Mumbai Indians | गोलंदाज आणि युवा खेळाडूंवरही टांगती तलवार :

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याच्याबाबतही संघ पुनर्विचार करू शकतो. नवीन चेंडूने प्रभावी ठरणारा बोल्ट यंदा अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेल्याने त्याच्या गोलंदाजीतील धार कमी झाल्याचे दिसून आले आहे.

दीपक चहर (Deepak Chahar) याच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. 9.75 कोटी रुपयांत घेतलेल्या या गोलंदाजाने मात्र निराशा केली आहे. त्यामुळे पुढील हंगामात मुंबई नवीन वेगवान गोलंदाजाला संधी देण्याचा विचार करू शकते. तिलक वर्मा (Tilak Varma) याच्याबाबतही कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे. 2022 पासून संघाचा भाग असलेल्या तिलकने 59 सामने खेळले, मात्र त्याला एकदाही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळालेला नाही. तसेच त्याच्या अर्धशतकांनंतरही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

News Title: Mumbai Indians Big Changes After IPL

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now