वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल!

On: May 12, 2024 1:41 PM
Crime News
---Advertisement---

Mumbai Crime News | पती आणि पत्नीत अनेकदा धुसफूस पाहायला मिळते. अशीच एक घटना मुंबईतील कुर्ला भागात घडली आहे. पतीने आपल्या पत्नीला वेळेवर नाश्ता न दिल्याने तिच्यावर पतीन हातोड्याने हल्ला केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Mumbai Crime News)

आरोपी पती फक्त एवढ्यावर थांबला नाहीतर त्याने स्क्रू ड्रायव्हरने पत्नीवर हल्ला केला. पत्नीला सध्या भा.भा रूग्णालयात आयसीय़ुमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीचे वय हे आता 34 वर्षे आहे. याप्रकरणाबाबत कुर्ला पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime News)

पत्नीने वेळेवर नाश्ता न बनवल्याने पत्नीवर केला हल्ला

गुडिया मोहम्मद फय्युम खान असं जखमी महिलेचं नाव आहे. पती फय्युम खान यांनी आपल्या पत्नीला गुरूवारी वेळेवर नाश्त्या न बनवल्याने तिच्यावर हल्ला केला. शिलाई मशीनवर ठेवलेल्या हातोड्याने हल्ला केला. तर तसेच स्क्रू ड्रायव्हरने देखील हल्ला केला. चाकूने गळ्यावर तीन वार केले. गुडिया या जागेवर खाली पडल्या. (Mumbai Crime News)

पत्नीवर उपचार सुरू

जखमी झालेल्या गुडिया यांना कुर्ल्यातील भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयुमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खानचा जबाब नोंदवला होता. पतीने हल्ला केल्याचं सांगितलं. (Mumbai Crime News)

घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी आपल्या पत्नीला धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

News Title – Mumbai Crime News Wife Husband

महत्त्वाच्या बातम्या

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Join WhatsApp Group

Join Now