खुशखबर! स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईकरांना मिळालं मोठं गिफ्ट!

On: August 15, 2025 10:42 AM
Mumbai Coastal Road
---Advertisement---

Mumbai Coastal Road | मुंबईकरांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आनंदाची बातमी आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र आणि चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी झाले. हे सर्व नागरिकांसाठी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजल्यापासून खुले करण्यात येणार आहे.

यासोबतच, आतापर्यंत सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत वाहतुकीसाठी खुला असणारा कोस्टल रोड आता 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 24 तासांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहनचालक आणि प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे. विहार क्षेत्रात प्रवेश विनामूल्य असून, विविध ठिकाणांहून भुयारी मार्गाद्वारे नागरिक सहज पोहोचू शकतात. (Mumbai Coastal Road)

भुयारी मार्गांची ठिकाणे आणि सुविधा :

भुयारी मार्ग क्रमांक 4 ला भुलाभाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारतीतून प्रवेश आहे. मार्ग क्रमांक 6 साठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) येथून, मार्ग क्रमांक 11 साठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्ध शाळेसमोरून, आणि मार्ग क्रमांक 14 साठी वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौकातून प्रवेशाची सोय आहे.

सर्व मार्गांवर पायऱ्यांसोबतच उतार मार्ग (रॅम्प) देण्यात आले आहेत, ज्यामुळे सायकलस्वार आणि दिव्यांग नागरिक सहज प्रवेश करू शकतील. या भुयारी मार्गांमुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Mumbai Coastal Road | विहार क्षेत्रातील विशेष सोयी :

बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहार क्षेत्रावर नागरिकांच्या विरंगुळा आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सायकल ट्रॅक, आसनव्यवस्था, ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे आणि समुद्रकिनाऱ्यावर वाढणाऱ्या झाडांची लागवड यांचा समावेश आहे. तसेच, व्हिलचेअर वापरणाऱ्यांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आले आहेत. (Mumbai Coastal Road)

हे विहार क्षेत्र समुद्रकिनारी फिरणे, सायकलिंग आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी नवे आकर्षण ठरेल. यामुळे नागरिकांना शहराच्या मध्यभागीच एक शांत आणि सुंदर अनुभव मिळणार असून, पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

News Title : Mumbai Coastal Road Now Open 24×7; 5.25 km Promenade and 4 Pedestrian Subways Open from Aug 15

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now