Mumbai | मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santacruz) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. सततच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून राज मोरे (Raj More) नावाच्या ३२ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने (CA) विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी (Vakola Police) दोघांना अटक केली असून, त्यांनी राजकडून सुमारे अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
समलैंगिक संबंधाचे व्हिडिओ शूट-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २६ वर्षीय मॉडेल राहुल परवानी (Rahul Parwani) आणि त्याची मैत्रीण सबा कुरेशी (Saba Qureshi) यांना अंधेरीतील लोखंडवाला परिसरातून अटक करण्यात आली आहे. राज आणि राहुल हे सप्टेंबर २०२४ मध्ये इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि त्यांच्यात समलैंगिक संबंध होते. राहुलने या संबंधांचे व्हिडिओ शूट केले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो राजला ब्लॅकमेल करत होता.
२ कोटी ४७ लाख रुपये उकळले होते-
या दोघांनी मिळून राजकडून जवळपास २ कोटी ४७ लाख रुपये उकळले होते. इतकेच नाही, तर राहुलने राजच्या नावावर एक एसयूव्ही कार घेतली होती आणि तिचे हप्तेही राजच भरत होता. राहुलने उकळलेले (Mumbai) पैसे शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राजने हे टोकाचे पाऊल उचलले.
राज मोरे हा काही दिवसांपूर्वीच कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून बरा झाला होता. या कठीण काळातही त्याने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, ब्लॅकमेलिंगचा हा त्रास तो सहन करू शकला नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आईसाठी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली, ज्यात त्याने ‘मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही’ असे म्हणत आईची माफी मागितली आणि आपल्या आत्याला आईची काळजी घेण्याची विनंती केली.






