Ms Dhoni | “20 किलो कमी कर, मी तुला IPL मध्ये घेतो”; धोनीची ‘या’ धडाकेबाज खेळाडूला ऑफर

On: December 8, 2023 8:14 PM
Ms Dhoni
---Advertisement---

Ms Dhoni | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) ची तयारी सुरू झाली आहे. 19 डिसेंबरला खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दुबईत होणाऱ्या आयपीएल 2024 च्या लिलावात अनेक देशांच्या संघातील खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अशात अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणने एमएस धोनीबाबत (Ms Dhoni) एक खुलासा केला आहे.

‘या’ खेळाडूला धोनीने दिली होती ऑफर

एका मुलाखतीत बोलताना असगर अफगानने धोनीसोबतचा किस्सा सांगितला. 2018 च्या आशिया कप दरम्यान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना बरोबरीत असताना धोनीने (Ms Dhoni) एका खेळाडूला ऑफर दिली होती.

विकेट किपर मोहम्मद शेहजादने 20 किलो वजन कमी केलं तर तो शेहजादची आयपीएलसाठी त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीमध्ये निवड करेल, असं धोनी म्हणाला होता.

त्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी सलामी देणाऱ्या शहजादने 116 चेंडूत 124 धावा केल्या. शहजादच्या या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीमुळे अफगाणिस्तान संघ निर्धारित 50 षटकांत 252/8 अशी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात भारतीय संघ 252 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना बरोबरीत सुटला. या खेळीसाठी शेहजादला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अफगाणने सामन्यानंतर धोनीशी केलेल्या संभाषणाची आठवण करून दिली. त्याने धोनीला सांगितलं होतं की मोहम्मद शहजाद त्याचा मोठा चाहता आहे. यानंतर धोनीने शहजादला वजन कमी करण्याचा सल्ला देत ऑफर दिलेली.

“तो सर्वोत्तम सामना होता”

भारतासोबतच्या टाय मॅचची आठवण करून देताना अफगाणिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला की, भारताविरुद्धचा 2018 चा टाय सामना माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण होता. तो सर्वोत्तम सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा

Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

Devendra Fadnavis | महायुतीत वादाची ठिणगी?; फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा

Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now