IPL 2026 सुरू होताच मोठा धक्का! एमएस धोनी सुरुवातीचे सामने खेळणार नाही

On: March 28, 2026 1:53 PM
MS Dhoni Injury IPL 2026
---Advertisement---

MS Dhoni Injury IPL 2026 | आयपीएल 2026 हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मैदानात दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएलच्या इतिहासात Chennai Super Kings आणि धोनी यांचे समीकरण अतूट मानले जाते. मात्र दुखापतीमुळे धोनीला या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दुखापतीमुळे दोन आठवडे बाहेर :

सीएसकेने सोशल मीडियावर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, धोनी सध्या कॅल्फ स्ट्रेन (पायाच्या स्नायूची दुखापत) या समस्येने त्रस्त आहे. त्याच्यावर सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू असून त्यामुळे आयपीएल 2026 च्या पहिल्या दोन आठवड्यांत तो मैदानात उतरू शकणार नाही. (MS Dhoni Injury IPL 2026)

याचा अर्थ धोनी किमान सुरुवातीचे तीन सामने गमावू शकतो. त्यामुळे संघाला या सामन्यांमध्ये धोनीशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे.

MS Dhoni Injury IPL 2026 | या सामन्यांना मुकण्याची शक्यता :

सीएसकेचा पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर 3 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळला जाईल. तसेच 5 एप्रिलला गतविजेते RCB विरुद्धही सामना होणार आहे. (IPL 2026 Update)

धोनी या तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो पुन्हा संघात परतू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

फिटनेसची समस्या कायम :

गेल्या काही हंगामांपासून धोनीला फिटनेसच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो अनेकदा त्रस्त दिसला आहे. 2024 च्या आयपीएल हंगामानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. (MS Dhoni Injury IPL 2026)

वाढत्या वयानुसार स्वतःला फिट ठेवणे हे मोठे आव्हान असल्याचे धोनीनेही अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या दुखापतीमुळे सीएसके आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे.

News Title: IPL 2026: MS Dhoni Likely to Miss First Two Weeks Due to Injury, Big Blow for CSK

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now