एम.एस. धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार का? CSK च्या कार्यक्रमात अखेर सांगूनच टाकलं

On: March 23, 2026 12:52 PM
MS Dhoni Net Worth
---Advertisement---

MS Dhoni IPL Retirement | इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सुरू होण्यापूर्वी क्रिकेट वर्तुळात नेहमीच एका विषयावर जोरदार चर्चा रंगते, ती म्हणजे एम. एस. धोनी (MS Dhoni) चा हा शेवटचा हंगाम असेल का? आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयोजित केलेल्या एका विशेष सोहळ्यात धोनीला त्याच्या रिटायर्नमेंटविषयी विचारण्यात आलं. यावेळी धोनी या प्रश्नावर स्पष्टपणे बोलला.

फ्रँचायझीने आयोजित केलेल्या एका सार्वजनिक सोहळ्यात मंचावर उपस्थित असताना या माजी कर्णधार धोनीला त्याच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबत आणि निवृत्तीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. हा अवघड प्रश्न सर्वांसमोर ऐकताच सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. सध्या तो ४४ वर्षांचा झाला असून, या वयात व्यावसायिक क्रिकेट खेळणे हे पूर्णपणे त्याच्या शारीरिक क्षमतेवर आणि फिटनेसवर अवलंबून असल्याचे त्याने उपस्थितांना दिलेल्या उत्तरातून स्पष्ट केले.

निवृत्तीच्या या बहुचर्चित प्रश्नाला सामोरे जाताना त्याने आपल्या शारीरिक स्थितीचा प्रामुख्याने उल्लेख केला. वयानुसार शरीराची साथ नेहमीच सारखी मिळत नाही, त्यात सातत्याने चढ-उतार होत असतात आणि अनेकदा तंदुरुस्ती खालावते ज्यामुळे खेळणे कठीण होऊन बसते, असे त्याने प्रांजळपणे कबूल केले. शरीर नेहमीच साथ देत नसले तरीही आपण मैदानावर उतरून स्वतःचे सर्वोत्तम योगदान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं तो म्हणाला.

या संपूर्ण संवादादरम्यान त्याने आपण नेमक्या कोणत्या वर्षी किंवा कोणत्या तारखेला क्रिकेटला कायमचा अलविदा करणार आहोत, हे स्पष्ट केलं नाही. असे असले तरी, त्याच्या बोलण्यातून त्याची प्रदीर्घ कारकीर्द आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचं त्याचं बोलण्यातून जाणवतय. मैदानावर आणखी किती काळ टिकून राहायचे आणि खेळायचे, याचा अंतिम निर्णय केवळ त्याच्या शरीराच्या प्रतिसादावर अवलंबून असेल.

Join WhatsApp Group

Join Now