Mpox | कोरोनानंतर जगभरात आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे. Mpox म्हणजेच मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. यामुळे अवघ्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे.भारतातही याचा झपाट्याने शिरकाव होत आहे.मंकीपॉक्स विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. (Mpox)
अलिकडेच पाकिस्तानमध्ये या संसर्गाची प्रकरणे समोर आली.यानंतर भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. या आजारावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र, लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लस येत नाही, तोपर्यंत जागरूकता हाच त्यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे. या Mpox विषाणूपासून बचाव करण्यासाठी या लेखात काही महत्त्वाच्या आणि सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.
Mpox हा व्हायरस म्हणजे काय?
Mpox विषाणू हा मंकीपॉक्स व्हायरस म्हणून ओळखला जातो. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, लिम्फ नोड्स सुजणे, ताप आणि फोड येणे. बऱ्याच प्रमाणात, हे कांजिण्या सारखे आहे.(Mpox)
Mpox ची लक्षणे काय आहेत?
ताप
थकवा
डोकेदुखी
थंडी जाणवणे
स्नायू दुखणे
सुजलेल्या लिम्फ नोड्स
पू भरलेली पुरळ(Mpox)
स्वतःचे संरक्षण कसे कराल?
हात स्वच्छ धुवून काढा : बाहेरून आल्यानंतर किंवा काही काम केल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवून काढा. शक्यतो, साबणाऐवजी हँड वॉशचा वापर करा.
फेस मास्क घाला : कोणत्याही प्रकारचे विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू नये यासाठी फेस मास्क वापरा. मास्क घातल्याने हवेतील विषाणूपासून तुमचा बचाव होईल.
आजारी प्राण्यांशी संपर्क टाळा : जवळपास असलेल्या कोणत्याही आजारी किंवा जखमी प्राण्यांना स्पर्श करणे टाळा, त्यांना पाळू नका किंवा त्यांच्या जवळ जाऊ नका.(Mpox)
प्रवाशांशी संपर्क टाळा : परदेशातून घरी परतलेल्या लोकांशी संपर्क टाळणे चांगले. त्यांना mpox विषाणूची लागण होऊ शकते.
पौष्टिक आहार घ्या : कोणत्याही विषाणूशी लढताना शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आहारात अधिकाधिक खनिजे आणि जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करा.
प्रवास टाळा : शक्य असल्यास लांबचा प्रवास टाळा.
News Title – Mpox virus protect yourself in these 6 way
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 4 राशींना आज मोठा आर्थिक फटका बसणार, बोलण्यावर ताबा ठेवा!
नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण
अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस
‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!






