खासदारांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट! पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ

On: March 25, 2025 9:49 AM
MP Salary Hike DA
---Advertisement---

MP Salary Hike | केंद्र सरकारने खासदारांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या पगारात तसेच भत्ते आणि निवृत्ती वेतनातही वाढ केली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ केल्याची माहिती अधिकृत अधिसूचनेतून देण्यात आली आहे.

खासदारांचे पगार, भत्ते आणि पेन्शन वाढले

संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खासदारांच्या पगारात आता लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी त्यांना दरमहा 1,00,000 रुपये वेतन मिळत होते. आता हा आकडा वाढवून 1,24,000 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, प्रतिदिन मिळणारा भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आला आहे.

निवृत्त खासदारांसाठी देखील पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना मासिक पेन्शन 25,000 रुपये मिळत होते, जे आता वाढवून 31,000 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी 5 वर्षांहून अधिक सेवा केली आहे, अशा माजी खासदारांना मिळणाऱ्या अतिरिक्त पेन्शनमध्येही वाढ झाली असून, ती 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आली आहे.

महागाईदर लक्षात घेऊन निर्णय, कर्मचाऱ्यांसाठीही दिलासा लवकरच

गेल्या पाच वर्षांतील वाढती महागाई लक्षात घेऊन ही पगारवाढ करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या वाढीसाठी रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या खर्च निर्देशांकाचा (Cost Inflation Index) आधार घेतला गेला आहे. परिणामी, ही सुधारणा सध्या काम करत असलेल्या आणि निवृत्त खासदारांना लागू होणार आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानमंडळाने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या वेतनात 100 टक्के वाढ केली होती. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारनेही खासदारांसाठी ही घोषणा केली आहे. कर्नाटकात हा निर्णय ‘कर्नाटक मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (सुधारणा) विधेयक 2025’ आणि ‘कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि भत्ते विधेयक 2025’ अंतर्गत घेण्यात आला.

दुसरीकडे, केंद्र सरकारचे कर्मचारीही महागाई भत्त्यातील (DA) वाढीची प्रतीक्षा करत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही वाढ मंजूर झाल्यास, जानेवारी 2025 पासून लागू होईल आणि कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या पगारासोबत मागील तीन महिन्यांची थकबाकी मिळू शकते.

Title : MP Salary Hike DA, Pension Also Increased

 

Join WhatsApp Group

Join Now