पुढील आठवडा ‘या’ ५ राशींसाठी ठरणार सर्वात भाग्यशाली; मिळणार बक्कळ पैसा

On: November 15, 2025 1:20 PM
Lucky Zodiac Signs
---Advertisement---

Astrology | नोव्हेंबर 2025 महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होण्याची तयारी झाली असून या काळात मार्गशीर्ष महिन्याचीही सुरूवात होत आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा कालावधी अतिशय शुभ मानला जातो. याचबरोबर 17 नोव्हेंबरपासून सूर्य आणि बुध वृश्चिक राशीत युती करणार असून त्यामुळे प्रभावशाली बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग संपत्ती, करिअर, यश, प्रतिष्ठा आणि मानसिक समाधानासाठी विशेष फलदायी ठरतो. (November Astrology)

या शुभ ग्रहयोगाचा थेट सकारात्मक प्रभाव पुढील सात दिवसांत पाच राशींवर पडणार आहे. 17 ते 23 नोव्हेंबरच्या या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडींचा अनुभव या राशींना येऊ शकतो. आर्थिक लाभ, करिअर वाढ, नोकरीच्या संधी, मालमत्ता विषयक शुभ बातम्या आणि वैयक्तिक नात्यांमध्ये समाधान असे अनेक चांगले परिणाम दिसून येणार आहेत.

आर्थिक लाभ, नोकरी प्रगती आणि कौटुंबिक आनंद :

मेष राशी :

मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळणार असून कामांमध्ये यशाची गती वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल आणि प्रलंबित मालमत्ता किंवा जमीन व्यवहारात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारीत वाढ किंवा नवी संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांसाठीही काळ अनुकूल असून कुटुंबात समाधान राहील.

मिथुन राशी :

मिथुन राशीसाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत सकारात्मक होईल. वरिष्ठांची साथ मिळून अपूर्ण कामे वेगाने पूर्ण होणार आहेत. दीर्घकाळापासून नोकरी बदल किंवा बदलीची वाट पाहणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीबाबतही लाभदायक स्थिती निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मनाला शांतता मिळेल.

कन्या राशी :

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील कालखंडापेक्षा अधिक लाभदायक ठरणार आहे. नवीन कमाईचे मार्ग खुलतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि व्यावसायिक क्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. करिअर प्रगतीला उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवनात सौहार्द राहील आणि कुटुंबातील सदस्य तुमचा आधार बनतील.

Astrology | पदोन्नती, आर्थिक यश आणि शुभ प्रसंगांची हजेरी :

तूळ राशी :

तूळ राशींसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आहे. करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. पदोन्नतीची शक्यता आहे आणि पगारवाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यवसायिकांना मोठा नफा होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात चांगल्या संधी तुमच्यासमोर येतील. कोर्ट-कचेरी, आरोग्य आणि आर्थिक तणाव कमी होईल.

धनु राशी :

धनु राशीसाठी येणारा आठवडा ऊर्जा, यश आणि प्रगतीने भरलेला असेल. नियोजित कामे वेळेआधी पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळेल. प्रवासातून आर्थिक फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, तर जोडप्यांमध्ये विश्वास वाढेल.

News Title: Most Lucky Zodiac Signs This Week: 5 Signs to Receive Wealth, Career Growth & Wish Fulfillment (17–23 November 2025)

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now