मोहित कंबोज यांच्या ट्विटने राजकारणात खळबळ!

On: May 5, 2024 1:02 PM
Mohit Kamboj tweet in discussion 
---Advertisement---

Mohit Kamboj | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा गौप्यस्फोट एका बड्या राजकीय नेत्याने केला आहे. इतकंच नाही तर, लवकरच याबाबत खुलासा करणार, असंही या नेत्याने म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करत हा खुलासा केलाय. महाविकास आघाडीचे सरकार असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठं कट कारस्थान करण्यात आल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय.

“मविआने फडणवीसांविरोधात मोठा कट रचला”

त्यांनी ट्वीरटवर एक पोस्ट करत हा दावा केला आहे. या कटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक बड्या महिला नेता, आयपीएस अधिकारी व एका आमदाराचा समावेश असल्याचं कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशात आता हे ट्वीट चर्चेत आलंय.

मोहित कंबोज यांचं ट्वीट नेमकं काय?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता. या कटासंदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक बडी महिला नेता, एक माजी आयपीएस अधिकारी आणि एका माजी पत्रकराचा समावेश आहे. या संदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असून यासाठी तयार राहा. असं ट्वीट कंबोज यांनी केलंय.

आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी थेट शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कंबोज यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते नेमका काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

News Title – Mohit Kamboj tweet in discussion 

Join WhatsApp Group

Join Now