MNS Avinash Jadhav | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निकटवर्तीय आणि मनसे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांच्याविरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. एका सराफाकडून 5 कोटी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांच्यावर करण्यात आला आहे.
अविनाश जाधव यांच्यावर गंभीर आरोप
अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) हे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. मुंबईतील एका व्यापाऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत एक ठक्कर नावाच्या व्यक्तीचा देखील समावेश आहे. खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी आणि कट रचणे या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आता समोर आलीये.
सोनाऱ्याला धमकावलं
अविनाश जाधव यांच्यावर नेहमी तक्रार केली जाते. अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) हे नेहमी चर्चेत असतात. मध्यंतरी झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मनसेकडून होणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांचा खारीचा वाटा असतो. त्यांनी मांडलेले प्रश्न हे जनसामान्यांमध्ये लावून धरले जातात.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच गुडीपाढव्याच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे आता मनसे नेते आणि कार्यकर्ते आता महायुतीच्या प्रचारसभेला उतरले आहेत. मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या बाजूने प्रचार करत आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली असून आता मनसे नेते नारायण राणेंचा प्रचार करत आहेत.
नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलीये. विनायक राऊत यांनी मी अडीच लाख मतांनी निवडून येईल असा दावा केला. त्यावर माध्यमांशी बोलत असताना अविनाश जाधव यांनी जर विनायक राऊत अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आले तर मी टक्कल करेल, असं म्हटलंय.
यावेळी बोलत असताना त्यांनी ठाकरे गटावर देखील टीका केली होती. ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सभा घेतली आणि दौरा केला. त्याचदिवशी मनसेनं नारायण राणेंसाठीही सभा घेतली.
News Title – MNS leader Avinash Jadhav Accused Of Threating Gold Jewellery Traders For 5 Crores
महत्त्वाच्या बातम्या
स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी
“मला लॉक केलं आणि कपडे काढून…”, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का
सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर






