आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

On: February 15, 2025 4:27 PM
MLA Shivajirao Kardile to Resume Public Service Soon
---Advertisement---

Shivajirao Kardile | आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या महिनाभरापूर्वीच पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली असून, लवकरच ते पुन्हा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत.

शस्त्रक्रियेनंतर घरी परतले, प्रशासन आणि कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू

मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर, आमदार कर्डिले चार दिवसांपूर्वी बुऱ्हाणनगर (Burhannagar) येथील निवासस्थानी परतले आहेत.

डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने, सध्या ते घरी राहून मतदारसंघातील कामांचा आढावा घेत आहेत. प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष ठेवत आहेत.

लवकरच मतदारसंघात सक्रिय होणार

पुढील आठ दिवसांनंतर आमदार कर्डिले पुन्हा मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतील. तब्बल ३० वर्षे आमदार राहिल्यानंतर प्रथमच त्यांनी शारीरिक कारणामुळे सक्रिय राजकारणातून काही काळ दूर राहावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे.

डॉक्टरांच्या सूचनेनुसार, कार्यकर्त्यांनी आणखी आठ ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिनाभर मुंबईतील रुग्णालयात राहिल्यानंतर आता ते लवकरच पुन्हा जनतेच्या संपर्कात येतील. मात्र, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत मर्यादित भेटीगाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Title : MLA Shivajirao Kardile to Resume Public Service Soon

 

Join WhatsApp Group

Join Now