‘पोलिस डोळे मिटून बसलेत का?’; पुणे पोलिसांवर मुरलीधर मोहोळ संतापले

On: February 22, 2025 10:34 AM
Minister Murlidhar Mohol Slams Pune Police 
---Advertisement---

Murlidhar Mohol | पुण्यात सोशल मीडियावर (social media) रील्स (reels) आणि फोटो (photos) टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाई करावी, असे केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी म्हटले आहे. ‘पुणे पोलिस डोळे मिटून बसले आहेत का?’ असा सवाल करत त्यांनी पुणे पोलिसांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा पुणे पोलिसांना सवाल

कोथरूड (Kothrud) परिसरातील चौकात जागा न मिळाल्याने विचारणा करणाऱ्या देवेंद्र जोग (Devendra Jog) या व्यक्तीला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली. या घटनेवर बोलताना मोहोळ म्हणाले, “पुण्यात सोशल मीडियावर रील्स, फोटो टाकून दहशत निर्माण केली जात आहे. तरुण पिढीने यातून काय घ्यायचे? माझ्या पुण्याचे नाव खराब व्हायला नको. पोलिसांनी हे सर्व थांबवले पाहिजे, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावे लागेल.”

‘पुण्याची संस्कृती वेगळी’

“पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत गुंडांची मजल जाते, हे चालणार नाही. पुणे पोलिस आयुक्तांनी (Police Commissioner) याचा गंभीर विचार करावा. जगाच्या नकाशावर पुणे हे सुसंस्कृत आणि विकसनशील शहर, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गृहमंत्री अशा प्रकरणात तत्काळ कारवाई करतात, हे आपण पाहिले आहे. ते कोणालाही पाठीशी घालत नाहीत,” असेही मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले.

कोथरूड परिसरातील चौकात जाण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे विचारणा करणाऱ्या व्यक्तीला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली. देवेंद्र जोग हे भारतीय जनता पक्षाचा (BJP) कार्यकर्ता आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीनंतर मोहोळ यांनी पोलिसांशी चर्चा केली.

‘चूक करणारा कोणीही असला, तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना वाचवायला कोणी येत असेल, तर त्यांना पोलिसांनी सोडू नये,’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सूचना केल्या. तसेच, असा प्रकार कोणत्याही पुणेकरांच्या बाबतीत घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले

Title : Minister Murlidhar Mohol Slams Pune Police 

 

Join WhatsApp Group

Join Now