पुणेकरांनो स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाची ३००० घरांची लॉटरी जाहीर

On: February 12, 2026 7:22 PM
MHADA Lottery 2026
---Advertisement---

MHADA Pune Lottery | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून मार्च महिन्यात तब्बल 3000 परवडणाऱ्या घरांची मेगा लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए परिसरासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण 4186 घरांच्या सोडतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.

घरे कुठे असणार? :

या लॉटरीमुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहराच्या जवळच्या भागात स्वस्त दरात घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या अडीच वर्षांत पुणे मंडळाने सुमारे 25 हजार घरे उपलब्ध करून दिली असून, ही अडीच वर्षांतील सातवी लॉटरी ठरणार आहे. पारदर्शक प्रक्रियेमुळे म्हाडावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. (MHADA Pune Lottery 2026)

शिरूर येथे 574 सदनिका आणि खराबवाडी येथे 194 व्यावसायिक गाळ्यांचे काम सुरू आहे. ताथवडे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात 750 निवासी आणि अनिवासी गाळ्यांचा समावेश असेल. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत काही घरे उपलब्ध होणार आहेत.

MHADA Pune Lottery | सोडत कधी निघणार? :

याशिवाय म्हाळुंगे, बारामती, पुरंदर आणि सोलापूर येथेही गृहप्रकल्प उभारले जात आहेत. या सर्व प्रकल्पांमधील घरे आगामी लॉटरीत समाविष्ट करण्यात येणार असल्याने पुणे विभागातील हजारो कुटुंबांना लाभ होणार आहे. (MHADA Pune Lottery)

म्हाडाच्या पुणे मंडळाकडून मार्च महिन्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्यता असून अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी आणि सोडतीची तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे घर खरेदीची संधी शोधणाऱ्यांनी म्हाडाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title : MHADA Pune Lottery 2026: 3000 Affordable Homes for Buyers in Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now