मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या सोडतीचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या सविस्तर

On: March 12, 2026 6:18 PM
MHADA Recruitment
---Advertisement---

MHADA Mumbai Lottery | मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांसाठी हे स्वप्न पूर्ण करणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाकडून (Maharashtra Housing and Area Development Authority) मुंबईकरांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 2500 घरांची लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

या लॉटरीसाठी मार्च महिन्याच्या अखेरीस अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस या घरांची सोडत काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची संधी शोधणाऱ्या हजारो नागरिकांचे लक्ष या लॉटरीकडे लागले आहे. (MHADA Mumbai Lottery)

मुंबईतील विविध भागात असतील घरे :

म्हाडाच्या या लॉटरीत मुंबईतील अनेक भागांमध्ये असलेल्या घरांचा समावेश करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार मागाठाणे, प्रतीक्षा नगर आणि विक्रोळी परिसरातील घरांचा या योजनेत समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात राहण्याची संधी अर्जदारांना मिळू शकते.

म्हाडा दरवर्षी विविध उत्पन्न गटांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी लॉटरी पद्धतीने विक्री करते. यावर्षीही कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे घर घेण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेकांसाठी ही लॉटरी महत्त्वाची ठरणार आहे.

MHADA Mumbai Lottery | पत्राचाळ प्रकल्पातील घरे यंदा लॉटरीत नाहीत :

यंदाच्या लॉटरीत सुरुवातीला सुमारे 5000 घरांचा समावेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे 2500 घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या घरांचा समावेश सध्याच्या लॉटरीत न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, मार्चच्या अखेरीस जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदारांना अर्ज भरण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून एप्रिलच्या शेवटी लॉटरीची सोडत काढली जाणार आहे.

News Title: MHADA Mumbai Lottery 2026 Date Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now