सर्वसामान्यांसाठी म्हाडाची खास ऑफर, केली मोठी घोषणा

On: November 14, 2025 5:38 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA | मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. मात्र वाढत्या घराच्या किमती आणि कठीण अर्ज प्रक्रिया यामुळे अनेकांचं हे स्वप्न अपुरंच राहतं. अशातच म्हाडा मुंबई मंडळाने (Mumbai MHADA Flat Sale) घर खरेदीदारांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. मागील काही सोडतींमध्ये रिक्त राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी आता म्हाडा विशेष लॉटरी घेणार आहे आणि ही लॉटरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आधारित असेल. त्यामुळे अर्जदारांचा पहिला अर्ज ज्या क्षणी पोहोचेल, त्या पात्र अर्जदाराला थेट घर मिळण्याची संधी असेल. (MHADA Flat Sale)

मुंबई मंडळाकडे अशा जवळपास 125 घरांची यादी तयार करण्यात आली आहे. या घरांची विक्री आता नव्या पद्धतीने करण्यात येणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांना घर घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वेळी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे.

फक्त आधार आणि पॅन कार्ड देऊन मिळणार घर :

म्हाडाची ही योजना सर्वसामान्यांसाठी आणखी सोपी करण्यावर भर देत आहे. योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे अर्जदाराकडे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तरीही त्याला घरासाठी अर्ज करता येणार आहे. मोठ्या प्रमाणात कागदपत्रं गोळा करण्याची गरज नसल्याने अनेक नागरिकांना ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.

या 125 घरांपैकी काही घरे सामाजिक आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या आरक्षणातील घरांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. सध्या या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि जाहिरात लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

MHADA | ताडदेव, वडाळा, पवईसह अनेक भागातील घरे उपलब्ध :

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा मुंबई मंडळ ताडदेव, वडाळा, तुंगा, पवई आणि इतर काही भागातील विक्रीविना पडून असलेल्या घरांची विक्री करण्याची तयारी करत आहे. या भागांमध्ये आधी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडती घेण्यात आल्या होत्या. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता ही घरे थेट प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई मंडळाच्या पणन विभागाने मिळून अंदाजे 125 रिक्त घरे शोधून काढली आहेत. यातील बहुतांश घरे मध्यम आणि उच्च गटातील असल्याचे समजते. त्यामुळे या श्रेणीतील नागरिकांना आता घर मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, घरांच्या अंतिम किमती निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल, असे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार असून पुढील काही दिवसांत सर्व प्रक्रिया समोर येणार आहे.

News Title : MHADA Mumbai Announces First-Come-First-Served Sale of 125 Flats; Only Aadhaar & PAN Required

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now