MHADA Lottery 2025 | घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने 5,285 घरांची बंपर लॉटरी जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून, म्हणजेच 14 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे.
5,285 सदनिकांसोबत 77 भूखंडांचीही संधी :
या लॉटरीमध्ये 5,285 सदनिकांसोबत 77 भूखंडांचाही समावेश आहे. ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर), ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथे ही घरं आणि भूखंड उपलब्ध होणार आहेत.
लॉटरीचा ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रम आज दुपारी 1 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. अर्जदारांसाठी IHLMS 2.0 प्रणाली आणि मोबाईल अॅपवरून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
MHADA Lottery 2025 | घरांचे वाटप पाच वेगवेगळ्या योजनांतर्गत :
या लॉटरीतील सदनिकांचं वाटप पुढील पाच घटकांमध्ये करण्यात येणार आहे:
– 20% सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका
– 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3,002 सदनिका
– कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (व विखुरलेल्या सदनिका) – 1,677 सदनिका
– 50% परवडणाऱ्या सदनिका योजना – 41 सदनिका
– भूखंड विक्री योजना – 77 भूखंड
अर्ज, अनामत रक्कम आणि यादी जाहीर करण्याच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59
अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59
प्रारूप पात्र अर्ज यादी: 21 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6:00
दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
अंतिम पात्र अर्ज यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 6:00
लॉटरी सोडत जाहीर होण्याची तारीख: 3 सप्टेंबर 2025, सकाळी 10:00, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
MHADA Lottery 2025 | SMS, ई-मेल आणि अॅपवरून मिळणार निकाल :
3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संगणकीय सोडतीचा निकाल मोबाईल SMS, ई-मेल आणि अॅपच्या माध्यमातून अर्जदारांना कळवला जाईल. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील निकाल पाहता येणार आहे.
IHLMS 2.0 प्रणाली Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची लिंक, मार्गदर्शक माहितीपुस्तिका, व्हिडिओ, हेल्प फाईल्स इत्यादी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी अर्जदारांना आवाहन केलं आहे की, लॉटरीत सहभागी होण्याआधी मार्गदर्शक माहिती काळजीपूर्वक वाचावी.






