“नवऱ्याने एकनाथ शिंदेंसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणं मला अजिबात पटलं नाही”

On: May 21, 2024 5:00 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Meghna Kirtikar | मुंबईमध्ये मतदान पार पडलं आहे. येथे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अमोल किर्तीकर उभे राहिले आहेत. तर, महायुतीकडून येथे शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलंय. मतदानापुर्वी या मतदारसंघात बरंच राजकीय नाट्य झालं.

महायुतीचे उमेदवार वायकर यांनी दबाव असल्याने शिंदे गटात गेल्याची जाहीर कबुली दिली होती. तर, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेले आहेत. अशात त्यांच्या पत्नी मेघना किर्तीकर आता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी माझा मुलगा अमोल किर्तीकर विजयी होणार, असा दावा केलाय.

मेघना किर्तीकर यांचा मोठा खुलासा

यासोबतच माझे पती गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्याचं आपल्याला पटलं नसल्याचं देखील मेघना यांनी म्हटलं आहे. जे पटत नाही ते सांगायला काय भीती? हे राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत मेघना किर्तीकर यांनी मोठा खुलासा केलाय.

“एकनाथ शिंदे हे वयाने आणि अनुभवाने किर्तीकर यांच्यापेक्षा लहान आहेत. अशा व्यक्तींसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणे, मला पटलेलं नाही. यासाठी मी त्यांचा विरोधही केला होता. पण, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जे हवं ते करण्याचा हक्क आहे. त्यांना जे पटलं त्यांनी ते केलं.”, असं मेघना किर्तीकर (Meghna Kirtikar) म्हणाल्या आहेत.

पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात

पुढे त्या म्हणाल्या की, “अमोल चांगल्या मतांनी निवडून येईल, माझी देवी त्याच्या पाठीशी आहे. मी आधी प्रचाराला जायची. पण, आता तब्येतीमुळे मला प्रचार करता आला नाही. पण अमोलच निवडून येईल.”, असा विश्वास देखील यावेळी मेघना किर्तीकर (Meghna Kirtikar) यांनी व्यक्त केला.

अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर लढत

दरम्यान, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेसाठी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. मात्र, अमोल कीर्तिकरांचे वडील खासदार गजानन कीर्तिकरांनी रवींद्र वायकर यांचा प्रचार केलाय. त्यामुळे इथली लढत अजूनच रंगतदार झालीये.

News Title – Meghna Kirtikar disclosure on Gajanan Kirtikar and Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!

कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट तर ‘या’ भागाला अवकाळी झोडपणार

“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट

Join WhatsApp Group

Join Now