मेरठ मर्डर केस प्रकरणातील आरोपी साहिलच्या आजीचा खळबळजनक खुलासा!

On: March 27, 2025 4:07 PM
---Advertisement---

Meerut | उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) येथील सौरभ मर्डर केसने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून, या प्रकरणात आता एक महत्त्वपूर्ण ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी साहिलच्या आजीने (आईची आई) कारागृहात साहिलला भेट दिल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, साहिलच्या आजीने सौरभबद्दल सहानुभूती व्यक्त करत त्याच्या मृत्यूमागील कारणांवर थेट भाष्य केलं.

आजीचा खळबळजनक खुलासा

साहिलची आजी बुधवारी बुलंदशहरहून मेरठमध्ये साहिलला भेटण्यासाठी कारागृहात आली होती. मात्र भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “साहिलपेक्षा सौरभची अवस्था अधिक वाईट झाली. त्याच्याबाबत मला खूप वाईट वाटतं.” त्यांनी असेही सांगितले की, त्या साहिलसाठी कपडे आणि चिवडा घेऊन आल्या होत्या, परंतु साहिलच्या वडिलांचे आगमन यावेळी झाले नाही.

या भेटीत साहिलच्या आजीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “साहिलला दोन मोठी व्यसनं होती – एक म्हणजे नशा आणि दुसरं म्हणजे बाई. या दोन गोष्टी त्याचं आयुष्य उध्वस्त करायला कारणीभूत ठरल्या. कदाचित हाच मुख्य कारणांपैकी एक असेल, ज्यामुळे हे सगळं घडलं.” या विधानामुळे सौरभच्या मृत्यूमागील आणखी एक कोन उघड झाला आहे.

तुरुंग प्रशासनाची प्रतिक्रिया आणि नियमबद्ध भेट

साहिलच्या आजीच्या भेटीबाबत विचारले असता मेरठ कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. विरेशे राज शर्मा यांनी सांगितले की, “साहिलच्या आजीने नियमांनुसार भेटीसाठी अर्ज केला होता. कुटुंबातील सदस्यांना कैद्याला भेटण्याची अनुमती तुरुंग नियमावलीत आहे. त्यामुळे त्यांना भेटू दिलं गेलं.”

तुरुंगात साहिलसोबत मारहाण किंवा अन्य प्रकारच्या गैरवर्तनाच्या अफवांना त्यांनी फेटाळून लावत हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, सौरभच्या हत्येप्रकरणात त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल हे दोघेही अटकेत असून, सौरभच्या कुटुंबीयांनी मुस्कानच्या नातेवाईकांवरही गंभीर आरोप केले आहेत. मात्र मुस्कानच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

 Title: Sahil’s Grandmother Blames Addiction for Murder

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now