डॉ. घैसास क्लिनिकची तोडफोड केल्यानं खासदार मेधा कुलकर्णी संतप्त, शहराध्यक्षांना धाडलं पत्र

On: April 7, 2025 11:56 AM
Medha Kulkarni
---Advertisement---

Medha Kulkarni | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपच्या महिला आघाडीने रुग्णालयात घडवलेल्या तोडफोडीबाबत भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपल्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी “सोम्या-गोम्यांनी कायदा हातात घेतला” असा टोला लगावत, पक्षाच्या प्रतिमेला लागलेला धक्का स्पष्टपणे अधोरेखित केला आहे.

रुग्णालयातील तोडफोडीवर संताप

मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पत्रात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये तोडफोड करून कार्यकर्त्यांनी पक्षाची नाचक्की केली आहे. कायद्याचे पालन न करता प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे वर्तन पक्षाच्या मूल्यांना शोभणारे नाही,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कुलकर्णी पुढे म्हणतात, “रुग्णालयाचा दोष काय आहे, हे समजून न घेता आंदोलन करणे चुकीचे आहे. आंदोलनाच्या सभ्य आणि शिस्तबद्ध पद्धती असतात. त्याचं पालन न केल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. पुणे शहराध्यक्ष म्हणून तुम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मी अपेक्षा करते.”

Medha Kulkarni यांचा इशारा

मेधा कुलकर्णी यांनी पत्रात स्पष्टपणे सांगितले की, “पक्षाची आणि कार्यकर्त्यांची प्रतिमा तयार होण्यासाठी वेळ लागतो, मात्र अशा घटनांमुळे ती प्रतिमा एका क्षणात मातीमोल होते. वडाचे तेल वांग्यावर काढल्यासारख्या कृतीमुळे विशिष्ट समाजाचे किंवा समूहाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”

त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, राजकीय व्यक्तींनी भावना नव्हे तर विचारांवर आधारित कृती करावी. यामुळेच पक्षाची विश्वसनीयता टिकून राहते.

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now