Ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाभार्थींना एक मोठा प्रश्न पडला आहे. (Ladki Bahin Yojana)
जूनचा 12वा हप्ता मिळण्याची शक्यता पुढील आठवड्यात :
या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा थेट DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून 1500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत एकूण 11 हप्ते जमा झाले असून, आता जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे.
सामान्यपणे हप्ता दर महिन्याच्या 15 तारखेच्या पुढे जमा केला जातो. मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हप्ता पुढील आठवड्यात म्हणजे जूनच्या अखेरीस बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana | लाभधारकांची छाननी सुरू, काहींना लाभ बंद होण्याची शक्यता :
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana)
या निर्णयामुळे अनेक महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यांपासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे लाभासाठी पात्र राहण्यासाठी उत्पन्नाची माहिती अचूक व पारदर्शक ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






