“…तेव्हा सासऱ्यांनी माझे कपडे फाडले”!, मयुरी हगवणेच्या नव्या आरोपांनी खळबळ

On: May 22, 2025 6:52 PM
mayuri hagawane
---Advertisement---

Mayuri Hagawane | वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता हगवणे कुटुंबातील ‘काळे कारनामे’ एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. हगवणे यांची मोठी सून, मयुरी जगताप हगवणे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना कुटुंबातील सदस्यांकडून तिला झालेल्या अतोनात छळाचा धक्कादायक खुलासा केला आहे. मयुरी सध्या घर सोडून माहेरी राहत असून, त्यांच्या आरोपांमुळे हगवणे कुटुंबावरील संशयाची सुई आणखी गडद झाली आहे.

आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे-

मयुरीनी (Mayuri Hagawane) केलेल्या आरोपानुसार, तिचा पती घरी नसताना दीर (शशांक हगवणे), सासू, सासरे आणि नणंद या चौघांकडून त्यांना बेदमपणे मारहाण केली जात होती. मयुरीचा अत्यंत सनसनाटी खुलासा करताना सांगितले की, “आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे. त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिली. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव तिच्या पतीला सुद्धा होती.” या शब्दांतून हगवणे कुटुंबातील क्रूरता आणि पती सुशील यांचा आपल्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न स्पष्ट होतो.

सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर शशांक हगवणे यांच्याकडून मयुरीला आणि धाकट्या सून वैष्णवीलाही भयंकर पद्धतीने त्रास दिला जात होता, असे मयुरीने सांगितले. यातून दोन्ही सुनांना सारख्याच छळाला सामोरे जावे लागले, हे स्पष्ट होते.

मयुरीचे धक्कादायक दावे-

आर्थिक मागण्या आणि मारहाणीबाबत बोलताना मयुरी जगताप यांनी धक्कादायक दावे केले. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या, असा आरोप मयुरी जगताप यांनी केला आहे. तसेच, सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्यूनर कार मागितल्याचे आपण स्वतः ऐकल्याचा दावाही मयुरी जगताप यांनी केला. हे सर्व आरोप हुंड्यासाठी होणाऱ्या छळावर अधिक प्रकाश टाकतात.

यापूर्वी मृत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याने मयुरी जगतापला मारहाण केल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या मारहाणीप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याचे मयुरी यांनी सांगितले आहे. या सर्व घटनांमुळे हगवणे कुटुंबातील स्त्रियांवरील अत्याचार आणि कुटुंबातील वाढता हिंसाचार स्पष्टपणे समोर आला आहे.

News Title – Mayuri Hagawane against in laws Assault, Dowry harassment.

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now