पुणेकरांनो, बाहेर पडण्याआधी ‘ही’ बातमी वाचा! सिंहगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी

On: August 19, 2025 12:37 PM
Pune News
---Advertisement---

Pune Traffic Jam | पुण्यात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असून विशेषतः सिंहगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. विठ्ठलवाडी परिसरात सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. (Pune Traffic Jam)

सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांची गती मंदावली असून कोंडी अधिकच वाढत आहे. त्यातच सिंहगड रस्त्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण झालेले नसल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण विद्यमान रस्त्यांवर येत असून पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला :

गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, कात्रज आणि नगर रोड या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी सकाळच्या ऑफिस अवर्समध्येच रस्त्यांवर प्रचंड वाहनांची गर्दी झाली. वाहतुकीचा वेग कमी झाल्याने लोकांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी दुप्पट वेळ लागत आहे.

शहरातील नागरिक पावसामुळे निर्माण झालेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे आणि वाहतुकीच्या ठप्प व्यवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. अनेकांनी प्रशासनाकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Pune Traffic Jam)

Pune Traffic Jam | पुणेकरांचा वाढता त्रास :

सिंहगड रस्ता हा पुण्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर वारंवार होणारी कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. उड्डाणपूलाचे काम पूर्ण झालेले असूनही लोकार्पण न झाल्याने वाहनचालकांना अजूनही जुन्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

याशिवाय शहरातील पर्यायी रस्त्यांची दुरवस्था असल्याने सर्व ताण सिंहगड रोडवर येतो. परिणामी नागरिकांचा प्रवास वेळखाऊ तर होतोच, शिवाय मानसिक तणावही वाढतो. वाहतुकीच्या या समस्येमुळे लोक प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.

News Title: Massive Traffic Jam on Pune’s Sinhgad Road Amid Heavy Rainfall; Long Queues of Vehicles Frustrate Commuters

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now