कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या घरात एका झटक्यात 14 मृतदेह पडले

On: May 7, 2025 2:21 PM
masood azhar
---Advertisement---

Masood Azhar | भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) बुधवारी पहाटे पाकिस्तानमधील (Pakistan) बहावलपूर (Bahawalpur) येथे जैश-ए-मोहम्मदचा  म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या (Maulana Masood Azhar) घरावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला रात्री सुमारे दीड वाजता करण्यात आला, त्यावेळी मसूद अझरचे कुटुंबीय घरात झोपले होते. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

अझर कुटुंबातील मृतांचा तपशील-

भारतीय सीमेपासून सुमारे १०० किलोमीटर आत असलेल्या या ठिकाणावर बॉम्बहल्ला करण्यात आला, ज्यात मसूद अझरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. तथापि, हल्ल्याच्या वेळी मसूद अझर स्वतः घरी उपस्थित नव्हता असेही या वृत्तांमध्ये म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या सदस्यांमध्ये मसूदची (Masood Azhar) पत्नी, त्याचा मुलगा आणि त्याचा भाऊ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारताच्या (India) मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेला मसूद अझरचा भाऊ रौफ असगर (Rauf Asghar) देखील या हल्ल्यात मारला गेला आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, हल्ल्याच्या वेळी मसूद अझरची मोठी बहीण, मौलाना कशफचे (Maulana Kashaf) संपूर्ण कुटुंब, मुफ्ती अब्दुल रौफचा (Mufti Abdul Rauf) नातू आणि शहीद बाजी सादिया (Shaheed Baaji Saadia) ही पती व चार मुलांसह घरात उपस्थित होती. या हल्ल्यात एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला, तर काहीजण जखमी झाले आहेत.

अझर कुटुंबाला मोठा फटका-

हल्ल्यानंतर मसूद अझरने एक निवेदन जारी करून आपल्या कुटुंबातील १० सदस्यांच्या मृत्यूला दुजोरा दिल्याचे समजते. त्याच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ५ मुलांचा आणि काही महिलांचा मृत्यू झाला असून, त्याचा मेहुणाही मारला गेला आहे. भारतीय सेनेने चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत झालेल्या या कारवाईत अझर कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. कुटुंबाच्या मृत्यूनंतर “मी पण मेलो असतो तर बरे झाले असते,” अशी प्रतिक्रिया मसूद अझरने दिल्याचे समजते.

मसूद अझरची पार्श्वभूमी आणि भारताचे आरोप-

मसूद अझर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (United Nations Security Council / UNSC) २०१९ मध्ये त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि तो भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतही समाविष्ट आहे. तो बऱ्याच काळापासून अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असून, आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी नवीन मदरशांची स्थापना करण्याची योजना आखत होता.

भारत सरकारचा (Indian government) आरोप आहे की, मसूद (Masood Azhar) पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवाया करतो. या ताज्या लष्करी कारवाईत भारताने मसूद अझरचे चार तळ उद्ध्वस्त केल्याचेही वृत्त आहे. १९८३ मध्ये त्याला अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेकडून प्रशिक्षण मिळाल्याचे सांगितले जाते. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे इस्लामी जगत (Islamic world) ढवळून निघाले असून, पाकिस्तानला उघड पाठिंबा देऊन नव्या चाली खेळल्या जात असल्याचेही काही अहवालांमध्ये म्हटले आहे.

News Title – Masood Azhar Family Reportedly Killed in operation sindoor

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now