शिव ठाकरे-गौतमीच्या गाण्यात भाव खाऊन गेलेली ‘ही’ चिमुकली कोण? जाणून घ्या तिच्याविषयी

On: March 27, 2026 7:12 PM
Rajnandini Dhumal
---Advertisement---

Masoli Sonyawani Song | नुकतंच मासोळी सोन्यावानी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्यात शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांच्या दमदार उपस्थितीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मासोळी सोन्यावानी’ (Masoli Sonyawani) हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून, त्यातील एका लहान मुलीच्या साध्या आणि मोहक अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाण्याच्या सुरुवातीला दिसणारी ही चिमुकली आपल्या निरागस हावभावांमुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

ही क्युट मुलगी नेमकी आहे तरी कोण?

या गोड चिमुकलीचे नाव राजनंदिनी सागर धुमाळ (Rajnandini Sagar Dhumal) असे असून, तिने इतक्या कमी वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. लोकप्रिय स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करताना तिने ज्या आत्मविश्वासाने काम केले आहे, त्याचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे. राजनंदिनीच्या सहज वावरामुळे गाण्यातील तो भाग अधिक जिवंत आणि प्रभावी वाटत आहे.

राजनंदिनीला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची (Modeling) प्रचंड आवड आहे. ती एक प्रस्थापित चाईल्ड मॉडेल (Child Model) म्हणून ओळखली जाते आणि तिने या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या अंगभूत कलेमुळे तिने आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही पटकावले आहेत. कॅमेऱ्यासमोरचा तिचा वावर पाहता, भविष्यात ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपाला येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘मासोळी सोन्यावानी’ या गाण्यामुळे तिला एक मोठी ओळख मिळाली असून, तिचे पुढचे प्रकल्प पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आता उत्सुक आहेत.

Join WhatsApp Group

Join Now