Mars Direct 2025 | मिथुन राशीमध्ये (Gemini) मंगळ ग्रहाची (Mangal Grah) चाल बदलणार आहे, ज्यामुळे काही राशींवर याचा मोठा प्रभाव पडेल. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा सेनापती मानल्या जाणाऱ्या मंगळाची चाल सरळ होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो, त्याचा प्रभाव कमी होतो; परंतु मंगळ सरळ मार्गी झाल्याने त्याचा प्रभाव वाढणार आहे, ज्यामुळे खालील राशीच्या व्यक्तींना विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
मेष आणि वृषभ राशीसाठी काळ कठीण-
मेष राशीच्या (Mesh Rashi) व्यक्तींसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. पूर्ण होत असलेली कामे रखडू शकतात. प्रतिष्ठा जपण्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, जोडीदारासोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. पूर्ण विचार करून कृती करणे योग्य राहील.
वृषभ राशीच्या (Vrushabh Rashi) व्यक्तींसाठी, मंगळाची सरळ चाल अडचणी वाढवू शकते. आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. नोकरीमध्ये (Job) अनपेक्षित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दिलेले उधार पैसे परत मिळण्यास अडचणी येऊ शकतात. खर्च जपून करावा.
कर्क राशीसाठी सतर्क राहण्याची आवश्यक-
कर्क राशीच्या (Kark Rashi) व्यक्तींनी मंगळाच्या मार्गी भ्रमणामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परीक्षा काळात विशेष लक्ष द्यावे.
मंगळ ग्रहाने 21 जानेवारी 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता आणि 7 डिसेंबर 2024 ला वक्री झाला होता. पंचांगानुसार, 24 फेब्रुवारी 2025, सोमवार रोजी सकाळी 7.27 मिनिटांनी मंगळ मिथुन राशीमध्ये मार्गी होणार आहे. जवळपास 80 दिवसांनंतर मंगळ आपल्या चालीमध्ये बदल करत आहे, ज्याचा प्रभाव या राशींवर पडेल.
English Title: Mars Direct 2025 Zodiac Signs to Watch








