March Born Personality | हिंदू पंचांगानुसार वर्षातील तिसरा महिना मानला जाणारा मार्च (March) हा अनेक वैशिष्ट्यांनी ओळखला जातो. या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये काही खास गुणधर्म दिसून येतात. ज्योतिषशास्त्राच्या मते या काळात जन्मलेल्या लोकांवर मीन (Pisces) आणि मेष (Aries) राशींचा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांच्या स्वभाव, नातेसंबंध आणि आयुष्यातील इतर बाबींमध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये दिसतात.
स्वभाव आणि वैयक्तिक गुणधर्म :
मार्च महिन्यात जन्मलेले लोक सहसा संवेदनशील आणि सहृदय स्वभावाचे असतात. इतरांच्या भावनांचा आदर करणे आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभाव असतो. ही मंडळी बहुतेक वेळा शांत राहणे पसंत करतात आणि स्वतःच्या विचारांच्या जगात रमून जातात. त्यामुळे अनेकदा ते अंतर्मुख असल्याचेही जाणवते.
याशिवाय त्यांच्यात सर्जनशीलतेचा उत्तम गुण आढळतो. कल्पनाशक्ती समृद्ध असल्यामुळे कला, संगीत किंवा लेखन अशा सर्जनशील क्षेत्रांकडे त्यांचा कल अधिक असतो. काम आणि नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा राखण्याची त्यांची वृत्ती असते. मात्र कधी कधी ते भावनिक निर्णय घेतात, त्यामुळे काही वेळा त्यांना अडचणींचाही सामना करावा लागू शकतो.
March Born Personality | करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्य :
वैवाहिक जीवनाबाबत पाहिले तर मार्चमध्ये जन्मलेले लोक जोडीदाराप्रती अत्यंत समर्पित असतात. कुटुंबाला ते मोठे महत्त्व देतात आणि नाते टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. स्वभावाने रोमँटिक असल्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. मात्र जोडीदाराकडून भावनिक आधाराची अपेक्षा असल्याने कधी कधी संवेदनशीलतेमुळे किंवा संशयी स्वभावामुळे किरकोळ वाद होण्याची शक्यता असते.
आर्थिक बाबतीत त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला काही चढ-उतार येऊ शकतात. प्रारंभी आर्थिक संघर्ष करावा लागला तरी पुढे मध्यमवयानंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असते. इतरांना मदत करण्याची वृत्ती किंवा आपल्या आवडींवर खर्च करण्याची सवय असल्यामुळे ते कधी कधी जास्त खर्च करतात. आरोग्याच्या दृष्टीने अतिविचारामुळे मानसिक ताण किंवा झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच पोटाचे विकार किंवा त्वचेच्या तक्रारीही जाणवू शकतात. शिक्षण, कला, समुपदेशन (Counseling), नर्सिंग, पर्यटन किंवा धार्मिक क्षेत्रात ते चांगली प्रगती करतात. कामाबाबत त्यांची चिकाटी मजबूत असल्यामुळे एकदा घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहतात.






